सोनियाच्या ताटी

वात्रटिका

सोनियाच्या ताटी
---------------------
राजाच्या थाटामध्ये
सोनियाच्या ताटामध्ये
रोज नव्या घाटामध्ये
खाणे आमचे चालू

भारी आमची ऐट
पदासाठी फाईट
त्यात आम्ही टाईट
गाणे आमचे चालू

आमचे एकच ध्येय
आमचे एकच प्येय
सत्ताच होय हो सत्ताच होय
म्हणून पीने आमचे चालू

विरोधी आणि आमच्या
एकच असतात वाटा
ते असतात छापा
तर आम्ही असतो काटा
आम्ही सारे पाव्हणे चालू

पद,प्रतिष्टेचे लेबल
पैशाचे सारे केबल
आमचे असतात टेबल
आमचे कमावणे चालू

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी