उणे दुणे
वात्रटिका
उणेदुणे
-----------
इथून तिथून सारीकडे
कर्जमाफीची ओरड आहे
शेतकऱ्यांच्या घशाला
अजूनही कोरड आहे
मालाच्या भावाचे म्हणाल
तर मागचे पाढे जुने आहेत
गरिबांचे कुणाला पडलेय
एकमेकांवर उणेदुणे आहेत
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.02.11.2017
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका......!
Comments
Post a Comment