गृहयुद्ध
गृहयुद्ध
---------
एकमेकांचं पटत नाही
तरी 'लिव्ह इन'चा प्रकार
भांडण खेळत उपभोगणे
असेच आजचे सरकार
ते देतात हिणकस वागणूक
यांना वेळोवेळी वाकवतात
हे मात्र सत्ता-सोशिकपणे
नुसतेच बोलून दाखवतात
आपण विरोधी कि सत्ताधारी
याची कुठे कुणाला शुद्ध आहे?
एकत्र संसार असला तरी
दोघांचं रोज गृहयुद्ध आहे...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment