किती बरं झालं असतं

किती बरं झालं असतं
--------------------------
किती बरं झालं असतं
जर माणूसच पृथ्वीवर नसता
पृथ्वीच्या काळजात नसते पडले जगोजगी भोकं
तिला सती करायला जंगलरूपी
कुणी भादरलं नसतं डोकं

किती बरं झालं असतं
जर माणूसच पृथ्वीवर नसता
लाखो छोट्या जीवानां
मुक्तपणे वागावेसे वाटले असते
आता ज्यांच जीवन संपत आलय
त्यांना जगावेसे वाटले असते

किती बरं झालं असतं
जर माणूसच पृथ्वीवर नसता
नसता आला धर्म कोणता
नसत्या आल्या जाती
दंगे पंगे नसते उभे राहिले
दिली नसती कुणी मानवतेला मुठमाती......!!

किती बरं झालं असतं
जर माणूसच पृथ्वीवर नसता
नसतं कसल पूण्य
आणि नसतं कसलं पाप
कुणालाच झाला नसता
मानवी वागणुकीचा ताप...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'