दुःखाचे क्षेत्र

वात्रटिका

तिच्या दुःखाचे क्षेत्र
-------------------------
मुलगी नको म्हणत
पोटातच घात असतो
नरडीचा घोट घेणारा
घरातलाच हात असतो

घरात उंदरं कुरताडतात
बाहेर लचके तोडणाऱ्या चोची
कसं वागावं,कसं जगावं
जाईल तेथे तिची गोची

तिच्या दुःखाचं क्षेत्र
आता तिला कळलं आहे
बाहेरच्यासोबत घरच्याही
हातांनी तिला छळलं आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344643

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी