बाहुबली

वात्रटिका

बाहुबली

नोटबंदीवर कावलेले
थिएटरखाली रांगेत दिसले
बाहुबलीचे दमदार घोडे
न्हाताना पैशाच्या गंगेत दिसले

भव्यदिव्यता,उत्सुकता
जाहिरातीतून ताणता आली
ते ते झाले बाहुबली
कोटी उड्डाणे हाणता आली

बाहुबलीला का मारला
हा राष्ट्रीय प्रश्न मिटला आहे
दाभोळकर-पानसरेंच काय झालं
आमच्या मनात प्रश्न पेटला आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे, बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'