हनुमान उडी
वात्रटिका
हनुमान उडी
------------------
नेहमी चर्चेत राहण्याची
त्यांना फारच गोडी असते
ताकद नसतानाही त्यांची
शाब्दिक हनुमान उडी असते
कितीही स्पष्ट केलं तरी
सहकाऱ्यांना जोश असतो
म्हणूनच पुन्हा पुन्हा
पदाविषयी घोष असतो
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.12.11.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment