निर्णयातील अस्थिरता
वात्रटिका
निर्णयातील अस्थिरता
------------------------------
नवा दिवस नवा निर्णय
याने सारी बेजारी आहे
रोज नवे प्रयोग करायला
इथे कोण आजारी आहे ?
फायद्याच्या कामासाठी
निर्णयाचा मामा होत आहे
ज्याने त्याने विचार करावा
काय काय कामा येत आहे
©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.05.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment