मराठीची घरघर

वात्रटिका

मराठीची घरघर
---------------------
मराठीच्या महाराष्ट्रात
मराठी चित्रपटाला वाव नाही
मराठीच्या महाराष्ट्रात
मराठी शाळांना ठाव नाही

मराठी जो माणूस आहे
त्याला तरी कुठे भाव आहे ?
मराठी संपवला जातोय
जणू काय तो वडापाव आहे

शिक्षण म्हणजे पाया असतो
तिथूनच सुरू घरघर झाली
म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात
माय मराठीला मर आली

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
मु.पो.च-हाटा ता.जि. बीड

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी