वाचत जा

वाचत जा
-------------
जीवनामध्ये जगताना
स्वतःला थोडं वाचत जा ||धृ||

मोठेपणाच्या गप्पा मारीत
पाहिजे तसा नाचत जा
जीवन एक खड्डा असतो
पाण्यासारखे साचत जा

मऊमऊ वाटत असेल
कधीमधी बोचत जा
भ्रमाच्या मोठ्या फुग्याला
कधी तरी टोचत जा

जीवन म्हणजे मीठ
चवीपुरते रुचत जा
जीवन म्हणजे अपचन
जगण्यापूरते पचत जा

जीवन म्हणजे पुस्तक
मनातुन वाचत जा
जीवन म्हणजे रान काळं
त्यात पीक खोचत जा

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मोबाईल:-9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी