सांगा ना साहेब
सांगा ना साहेब
--------------------
तुम्हीच माणसाच्या औलादी
आम्ही किडेमुंग्या जणू
आमचं जगणं जगणं नाही
जीव मुठीत धरून
रोज मरावं लागतंय आम्हाला
भाव मिळत नाही
दहशतवादी हल्ला होतो
ऑक्सिजन मिळत नाही
पूल तुटतो
रस्ता खराब होतो
रेल्वे अपघात होतो
बिल्डिंग ढासळते
आम्हीच मरायचं....!
मरणावर आमचंच नाव का असतं साहेब?
कोणी व्हीआयपी का मरत नाही
सांगा ना साहेब...!
आम्ही काय करायचं ?
तक्रार कुठं करायची ?
की असच मरत राहायचं
स्वतःला किडामुंगी समजून
सरकार कोणाचंही असुद्या
भाषण कोणाचंही असुद्या
तुमच्या भाषणाने
कधीच पोट भरत नाही
आणि कधीच कोणी तरत नाही
आणखी एक साहेब
जगायला काही करता आलं
तर बघा
कारण
मुडद्यावर चिल्लर उधळून काही उपयोग नसतो....!!
⚫ श्रीकृष्ण उबाळे,बीड
Comments
Post a Comment