माणूस

आजची टीका.....!!

माणुस
---------
कुणाला जनावर म्हणा
त्याला येतो राग
त्याची कळी खुलेल
म्हणा तुम्ही वाघ

नावापुढे सिंह लावणे
वाटत असतो खांदाणीपणा
माणूस असतो दुटप्पी
समजतो स्वतःला शहाणा

माणूस तर जनावरच आहे
नको असते उघड सत्य
जनावरापेक्षा घाणेरडी
करतो अनेक कृत्य.....!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी