झेंडा

*विद्रोही कविता*

झेंडा
-------
सगळ्यांसमोर बलात्कार झाले
किंकाळयांनी आसमंत फाटले
आब्रूमध्ये कुणीही हात घातले
आर्ततेने सारे रक्त जरी आटले

मरण्यापेक्षा जगणे महाग झाले
अनेक शेतकरी फासावर गेले
मजुरांनी पोटभर इंडरेल पेले
लाखोंनी जरी रेलचेल मेले

धान्य जरी खायला नसले
दारुचे भरमसाठ कारखाने असले
कोटी कोटींचे अनुदान असले
सगळ्यांचे जरी जीवन नासले

कोणी कसेही खाऊ लागले
गुंड मवाली कसेही वागले
किती आतंकी झाले
किती हल्ले त्यांनी केले

पैसे वाटून मंत्री झाले
दारू पाजून निवडून आले
बेकार कितीही भटकू लागले
अस्मितेवर कुणीबी हाणू लागले

तरी

कान असून ऐकायचे नाही
डोळे असून पहायचे नाही
अन्
तोंड असून बोलायच नाही

सागळयांकडे बघुन वाटतं
खरच आपण पक्के झालो
नंबर एकचे छक्के झालो
कोणीबी येतो काहीही करतो
खणार आम्ही धक्के झालो

कुठे गेला आमचा बाणा
कुठे गेला आमचा राणा
कुठे गेले आमचे वार
कुठे गेली आमची तलवार
कुठे गेली आमची शान
कुठे मेला आमचा स्वाभिमान
कुणी मुरगळली आमची मान
बाहुतलं सळसळतं रक्त
खरच झालय का थंड
कान डोळे तोंड असून
विझलय सारं बंड

झोपेतुन उठू जरा जाग येऊ द्या
भानावर येऊन जरा राग येऊ द्या

कान बधीर असले
उकळतं शिसं ओता
डोळे आंधळे असले
कडकडतं तेल ओता
पंगु मुके असाल
तोंडात ठेवा चेतवलेली तोफ
हातात घ्या मशाल ज्वालामुखीच्या क्रांतीची
फोड डरकाळी गर्जुन सिंहाची

गर्जनेने आसमंत फाटु दे
क्रांतीने सारे जग पेटू दे
तेंव्हाच ही आग शांत होईल
झेंडा आपला दिमाखाने फडकत राहील.....!!

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'