स्वातंत्र्य

स्वातंत्र्य
-----------

आज स्वातंत्र्याचा अर्थ
खऱ्या अर्थाने सार्थ झाला
ज्यांच्या हाती पदे आली
त्यांनी आपापला परमार्थ केला

स्वातंत्र्यासाठी लढणारे मेले
खरे बोलणाऱ्याना गोळ्या आहेत
स्वातंत्र्य बेधुंदपणे उपभोगणाऱ्या
इथे पदोपदी टोळ्या आहेत

पंधरा ऑगस्टला आम्हाला
स्वातंत्र्याचा भास होतो
आजही आपल्या देशात
पारतंत्र्याचा वास येतो...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'