बुडाखाली अंधार
आजची टीका.....!!
बुडाखाली अंधार
----------------------
इलेक्ट्रॉनिक चौथा स्तंभ
न्यायाधिशाप्रमांणे वागत आहे
पुढच्याच्या भावना काही असो
हवे तेच उत्तर मागत आहे
खऱ्याचे खोटे खोटयाचे खरे
करण्याची शक्कल असते
त्यांना वाटत असेल
लोकांना अक्कल नसते
त्यांच्या पेड अनपेडचे धंदे
त्यावर त्यांची मदार आहे
जगाला डोस पाजणा-यांच्या
बुडाखाली अंधार आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment