गायी गायी
आजची वात्रटिका....!!
गायी गायी
--------------
गायी गायी वादात
जो तो वादाच्या नादात
वादाचा नाद
कायदा बाद
कायदा आला हातात
उपयोगी पडतो घातात
घात माणसं मारितो
माणुसकीला धूळ चारितो
धूळ प्रधानाच्या डोळ्यात
प्रधान रडतो सोहळ्यात
लाल किल्ल्यात बोलबाला
आधी मला गोळ्या घाला
👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment