फ्रेंडशिप डे
*2005 साली लिहिलेली एक कविता....*
👬👬👬👬👬
*फ्रेंडशिप डे*
आज मित्र जमले अनेक
त्यांची मैत्री आहे नेक
असेच एकत्र खातात केक
करतात नंतर ओवरटेक ||1||
रोज एकमेकांच्या
करतात उचाळक्या
पाठीमागे मित्राच्या
चालतात उनाडक्या ||2||
मैत्रीला खऱ्या
दिवस कशाला ?
धाग्या दोऱ्याची
हवस कशाला ? ||3||
बांधून नुसते
रंगीबिरंगी बँड
कोणीच नसतो
कोणाचा फ्रेंड ||4||
मैत्री असावी हृदयातुन
बँड कशाला हवी ?
फ्रेंडशिपची कधीच
वेळ न यावी ||5||
मैत्री असावी 'एवरी डे'
मग
हवा कशाला 'फ्रेंडशिप डे' ? ||6||
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
माझ्या कविता,वात्रटिका
वाचण्यासाठी खालील लिंकला
नक्की भेट द्या....!!
aajchitika.blogspot.in
👬👬👬👬👬👬👬
Comments
Post a Comment