पोळखोल

आजची वात्रटिका....!!

पोळ-खोल
--------------
बोगस असूनही
डॉक्टर म्हणून मिरवू लागतात
खून करून खड्यात पुरुन
माणुसकिचा कंड जिरवू लागतात

पुरलेल्या माणुसकीवर
सैतानी पोळ वाढले आहेत
ढिम्म झालेल्या व्यवस्थेची
नाकं त्याने खुडले आहेत

दहा अकरा वर्षाच्या
झाडांच्या मुळ्या खोलच खोल
व्यवस्थेचेही सांगाडे कुजलेत
सारे सारे दिसते फोलच फोल

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
  aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'