वाढदिवस

आजची वात्रटिका.....!!
वाढदिवस
-------------
या नेत्याचा वाढदिवस
त्या नेत्याचा वाढदिवस
जाहिरात आणि पोस्टरला
फुटतात सारे पेव
शुभेच्छा देणाऱ्यानाही
येत असतो खुप चेव

मायबापाची काळजी कोणाला
त्यांचा कसला वाढदिवस?
नेत्यांसाठी सारे खपतात
मायबापाचा डायरेक्ट दिवस..!

नेत्यांसाठी उदोउदो करताना
मायबापाला जपलं पाहिजे
कोणाचा निष्ठावान होताना
मायबापासाठीही खपलं पाहिजे

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
  aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी