पिताळले
आजची वात्रटिका
पिताळले
------------
मोठ्यांभोवती वलय असतात
खोटे ठरते त्यांचे कर्म
अयुर्वेदिक त्याचे डोस
बोगस संस्काराचा धर्म
'सकाळ' 'साम' प्रवचने
बोगस आचार्य माताळले आहेत
विश्वासपात्र तांब्याचे नाणे
आता मात्र पिताळले आहेत
धर्माचे नाव घेऊन
काहीही खपवलं जातय
स्वतः बोगस असल्याचही
भक्तिमार्गाने लपवलं जातय
👉 श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment