नव्याची दृष्टी
वात्रटिका
नव्याची दृष्टी
------------------
सूर्य उगवला मावळला
पण सूर्य स्थिर असतो
खरेपणा समजून घेण्याचा
कुठे कुणाला धीर असतो?
प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस
लखलखीत नवा असतो
काळाचा वापर करणारा
योग्य भिडू हवा असतो
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०१.०१.२०१८
Visit :- aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment