स्वागताचे पाढे

वात्रटिका

स्वागताचे पाढे
--------------------
नव्याचे स्वागत करताना
जुन्याचा विसर नको
भूतकाळातील चुकांची
पुन्हा नव्याने कसर नको

जुनाही कधी नवा होता
याची जाणीव राखावी
असेल काही कात बाकी
झटकून सारी टाकावी

नव्याचा नऊ दिवसांनी
मागची वणवण नको
पुन्हा पुन्हा चुना लावून
मागचे पाढे पंचावन्न नको

©श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.चऱ्हाटा ता.बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'