असत्याचा नंगानाच

वात्रटिका

असत्याचा नंगानाच
---------------------------
खरे बोलायला जावे तर
कट झालेला पत्ता आहे
सत्यावर जय मिळवून
असत्याची सत्ता आहे

सत्य बोलणारा टोचत असतो
सत्य बोलणारा बोचत असतो
धर्म परंपरेचे नाव घेऊन
असत्यावला नंगा नाचत असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.१८.०१.२०१८
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'