शाहीहात

वात्रटिका

'शाही'हात

मूठभर हरभरे वाटून
म्हणे पुरणाचे जेवण दिले
जिभेवरची चव जाईना
म्हणे आम्हीही सेवन केले

उद्धाटने भरपूर झाली
कामाचा मात्र पत्ता नाही
देश बदलून टाकणारी
आमच्यासारखी सत्ता नाही

कोणी सत्ताधीश असला
स्वतःसाठी योजत असतो
मतदारांचा शाही हात
पाच वर्षाला भाजत असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मु.च-हाटा ता.जि. बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'