झेंडा आणि अजेंडा

वात्रटिका

झेंडा आणि अजेंडा

जयजयकार एकाचा
काम मात्र दुसऱ्याचं
'शिव'नामाचं पांघरूण
महाराष्ट्रात आसऱ्याचं

लोकांना उल्लू बनवणारा
खांद्यावरचा झेंडा असतो
रंगावर कोणी जाऊ नये
आतून भलताच अजेंडा असतो

असे झेंड्या अजेंड्यावाले
ओळखायला शिकलं पाहिजे
महाराष्ट्राचं खरं शिवपण
चिरकाल टिकलं पाहिजे

©श्रीकृष्ण उबाळे
मु.पो. च-हाटा ता.बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'