Posts

Showing posts from 2020

संधीची असमानता

Image
वात्रटिका संधीची असमानता संधीची समानता संविधानाचा आत्मा आत्म्याचा राज्यात दिवसाढवळ्या खात्मा समतेच्या गप्पा बोलायच्या असतात व्यवहारात मात्र कोलायच्या असतात...! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.9405344642

पर्याय

Image
वात्रटिका पर्याय उंदरांचा त्रास होता म्हणे केलं आता खुश पर्याय म्हणून त्याला सोडली मोठी घुस घुस किती लाभाची वाजतगाजत वरात  अपेक्षांच्या पावसाची मुसळधार खैरात...! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.9405344642

ठिगळं

Image
वात्रटिका ठिगळं गुत्तेदाराने मॅनेज करून कामच केलं सगळं एका वर्षाच्या आतमध्ये रस्त्याला पडली ठिगळं प्रश्न काही विचारायला कोणी जीभ नाही हालवली वर्षानुवर्षे डांबरखाऊंनी वार्षिक योजना चालवली....! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

सत्तेतील दानव

Image
वात्रटिका #सत्तेतील दानव सत्तेवाले शेतकऱ्यांची सांगू लागले कहाणी कोणी म्हणे खलिस्तानी कोणी चिनी पाकिस्तानी निरंकुश सत्तेचा  जागा झाला दानव मग सांगा कशी येईल  बापाची आपल्या कणव ? कोणतीही सत्ता असो नियत नसते साफ बापही सत्तेपोटी वाटतो त्यांना साप....! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.9405344642

डिग्रीवर शंका

Image
वात्रटिका डिग्रीवर शंका बाद झालेल्या मतांचा राज्यात झाला विक्रम पदवीधर म्हणता म्हणता म्हणा आम्हाला चक्रम शिकलेले असल्याचा कशाला वाजवा डंका ? बायकोच आता डिग्रीवर घेऊ लागलीय शंका....! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

तीनचाकी रिक्षा

Image
वात्रटिका #तीनचाकी रिक्षा बुलेट ट्रेनला टाटा तीनचाकी रिक्षाची आवड विधान परिषदेची यावेळी अशीच काहीशी निवड एककल्ली तुणतुण्याचा ज्यांना ज्यांना नाद आहे सुशिक्षित लोकांकडून त्यांना हवाई प्रसाद आहे -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

बोध आणि शोध

Image
वात्रटिका बोध आणि शोध कुणाचे पाळीव झाल्यावर  सांगेन त्यावर भुंकावे लागते मालक विरोधकांच्या अंगावर  वेळोवेळा थुंकावे लागते कुत्र्यांना हाकालले जाते कुत्र्यांना खिदडले जाते तरीही भुंकने न थांबल्यास कुत्र्यांना बदडले जाते आपण कोण आहोत ज्याने त्याने बोध घ्यावा आपल्या ओंगळ अवस्थेचा मनातून एकदा शोध घ्यावा. -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.9405344642

एक फुल

वात्रटिका एक फूल 'सडा किंवा सोडा' एका फुलाची स्थिती घड्याळाच्या काट्यासह धावून आली बारामती रेशीमबागेलं एक फूल देव इंद्रामुळं भटकलं साहेबांच्या सावलीखाली गोविंदबागेत चिटकलं -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

उपमेचा टणत्कार

Image
वात्रटिका उपमेचा टणत्कार उपमेच्या घंटीचा मोठा झाला टणत्कार घसरलेल्या पातळीचा रोज नवा चमत्कार स्वाभिमानी झाला बेडूक वाघही बनला मांजर सत्तासोडून काही नको त्यावरच त्यांची नजर....! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

सुका किंवा ओला

वात्रटिका सुका किंवा ओला बळीराजाला निसर्गाचा भयानक टोला असतो पाचवीला पुजलेला सुका किंवा ओला असतो उदंड होतात दौरे कॅमेऱ्याने झळकून जातात पोशिंद्याच्या समस्या तशाच कळकून जातात -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

उजेडाची भीती

Image
वात्रटिका उजेडाची भीती मृतदेहाला घाबरणारी ताकत ती किती आहे ? अंधाराच्या साम्राज्याला उजेडाची भीती आहे स्वतःच्या मुलींसाठी विचाराची ज्योत जळू द्या जात, धर्म, पक्षाच्या अंधानो तुमचे किडे वळवळू द्या...! -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

तराजूची बाजू

Image
वात्रटिका तराजूची बाजू राजसत्ता बलवानांची खुलेआम रखेल आहे कमजोराने ब्र काढणे आगीमध्ये तेल आहे ? न्यायदेवता आंधळी हातात असते तराजू वजन ज्यांचे पडते झुकते तिकडेच बाजू -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

ऊसतोड नेते

Image
वात्रटिका ऊसतोड नेते ऊसतोड्यांच्या नेतृत्वावरून राजकारण्यांमध्ये भांडण यांच्या मिरवामिरविणे कामगारांचे झाले कांडण ज्याची लाज वाटावी त्यांच्यासाठीच मिरवतात मूळ प्रश्न सोडून देऊन एकमेकांची जिरवतात -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

कुत्रकारिता

वात्रटिका कुत्रकारिता पाळीव टिव्ही पत्रकार मालकाचं ओकू लागले कुत्र्यापेक्षा चवताळून मोठमोठ्याने भोकू लागले इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेत अशांचाच जास्त वावर बातम्या नको सांगू बाबा पण कुत्रे जरा आवर....! -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

पाया गमावलेली इमारत

वात्रटिका पाया गमावलेली इमारत विदेशीच्या मापाने देशीपणा तोलत आहोत मराठीची लाज वाटते इंग्रजी झेलत आहोत आई-बाबा सारखे शब्द आमच्यादेखत हरपून गेले ज्याला त्याला जर्सी हवीय गावरानपण करपून गेले पाळेमुळे तोडून स्वतःचे उंच आम्ही बनतो आहोत पाया गमावलेली वास्तू विकास झाला म्हणतो आहोत -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

पाया गमावलेली इमारत

वात्रटिका पाया गमावलेली इमारत विदेशीच्या मापाने देशीपणा तोलत आहोत मराठीची लाज वाटते इंग्रजी झेलत आहोत आई-बाबा सारखे शब्द आमच्यादेखत हरपून गेले ज्याला त्याला जर्सी हवीय गावरानपण करपून गेले पाळेमुळे तोडून स्वतःचे उंच आम्ही बनतो आहोत पाया गमावलेली वास्तू विकास झाला म्हणतो आहोत -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

कुर्बानी व बळी

वात्रटिका कुर्बानी व बळी कुणी कुर्बानी म्हणतो कुणी बळी म्हणतो गरीब बिचाऱ्यांच्या माना धर्माच्या नावाने हाणतो ज्या दिवशी माणसातील हैवानानाची कुर्बानी सैतानाचा बळी जाईल त्या दिवशी खरा धर्म माणसांच्या गळी येईल -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

बापकमाई

Image
कविता बापकमाई लगडलेलं बहरलेलं  बाप नावाचं एक झाड  सावली देतं पोट भरतं  रसासाठी बनतं पाड त्याचे जेवढे लेकरं घेतात त्याला वाटून हापापलेपणा पाहून डोळ्यात येतं दाटून वेगळेपणा असेनाका रहा बाबांनो सुखात बापकमाईचं उत्पन्न जाऊद्या साऱ्या मुखात अनेक वर्षे फळ देत झाड शेवटी वाळून गेलं बहरलेलं त्याचं वैभव सारं सारं गळून गेलं बापाच्या काटक्या जाळून चुली पोरांच्या पेटत होत्या बापाने कमावलंच काय ? चर्चा रटरटत होत्या....!!😢 -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

पॅशन आणि फॅशन

पॅशन आणि फॅशन शिकलेल्यांच्या वागण्यात सारे लफडेच लफडे जे झाकायला होते तेच दाखवायला कपडे कमीतकमी कपडे आजकालची पॅशन कपडेच न घालण्याची कदाचित येईल फॅशन -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

मोके पे चौका

वात्रटिका मोके पे चौका जगासाठी कोरोना अस्तित्वाला धोका संधीसाधू नजरांना दिसतो मोठा मोका भीतीचे मार्केटिंग हा उघड धंदा आहे योगायोग नाही राव यातच खरा चंदा आहे खरे खोटे जाणायला आम्ही खरंच भोळे टपलेल्या बगळ्यांचे कधी ओळखणार चाळे ? -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

'बारा'चे

'बारा'चे साहित्याच्या बोकांडी 'राव' कलेच्या बोकांडी 'बला' परिषदेत जमण्यासाठी बगळ्यांचीच मलमला हवे तेच करतात एवढी लोकशाही वाकली सत्तर वर्षाची म्हातारी खरंच आता थकली ज्यांच्या हाती सत्ता त्यांच्या पक्षाच्या थराचे राज्यपाल नियुक्त असे असतात 'बारा'चे -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

मंत्र्यांचा कोरोना

Image
वात्रटिका मंत्र्यांचा कोरोना मंत्र्यांचा कोरोना मोठेपणा करतो सामान्यांचा कोरोना जीवानिशी मारतो मंत्र्यांचा कोरोना मुंबईला पळवतो सामान्यांचा कोरोना सिव्हिलला छळवतो...!😢 -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

अर्थव्यवस्थेचा कणा

Image
वात्रटिका अर्थव्यवस्थेचा कणा दारू महाग झाली म्हणूून त्याचा कधी मोर्चा नाही राजकारण्यांची आस्थेने त्यावर साधी चर्चा नाही रांगेत उभे राहायला कधी तो दमत नाही त्याच्याशिवाय सरकारला काम करणं जमत नाही बेवडा, पेताड, दारुडा असं तुम्ही काहीही म्हणा तो मात्र खरा देशीभक्त अर्थव्यवस्थेचा कणा...! -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

'शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे की' तुकोबांचा संपूर्ण अभंग

Image
शिव तुझे नाव ठेविले पवित्र | छत्रपती सूत्र विश्वाचे की ||१|| ऐसा हा करावा नित्य व्यवहार | दुष्टांचा संहार धर्मनित ||२|| स्त्री कुणबियांचे करावे पालन | आणिक निर्दालन ठकाठकी ||३|| भेदाभेद भ्रम सारावा विचार | निश्चयाचे सार बाणावे ते ||४|| तुका म्हणे ऐसे जाणावे हे वर्म रक्षावया धर्म सत्य जगी ||५||

You can easily meet living God.

Image
"Look for a living God than finding God in pilgrimage" "मायबापे केवळ काशी | तेणें न जावे तीर्थाशी ||१|| पुंडलिके काय केले | परब्रम्ह उभे ठेले ||२|| तैसा होई सावधान | हृदयी धरी नारायण ||३|| तुका म्हणे मायबापे | अवघी देवाची स्वरूपे ||४||" - Saint Tukaram Maharaj     God is a emotional matter for any person, irrespective of their caste and religion. People perform many pujas, go to the temples and do fasting to please the god. Those who have money go to Char Dham pilgrimage , Kashi, Benaras, Balaji, Vaishnavi  Devi etc. The purpose is the same, To meet a GOD ,God must meet. Does God actually meet in pilgrimage?  Do you get virtue?  What do the Saints think about this?  Our great Saint Tukaram Maharaj of Maharashtra has said in his Abhanga (devotional poetry)/ In one of the Abhang of great Saint Tukaram Maharaj says:                "तीर्थी धोंडा पाणी                 देव रोकडा सज्जनी...

मर्कटपणा

Image
वात्रटिका मर्कटपणा कोणत्याही आजारावर आमच्याकडे सूत्र असते शेणात कालवून खायला गो मातेचे मूत्र असते नको तिथे दाखवलेला हा मर्कटपणा आहे सारं काही जाणूनही माणूस कुठे शहाणा आहे ? -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

मर्कटपणा

वात्रटिका मर्कटपणा कोणत्याही आजारावर आमच्याकडे उतारा असतो शेणात कालवून खायला गो मातेचा मुतारा असतो नको तिथे दाखवलेला हा मर्कटपणा आहे सारं काही जाणूनही माणूस कुठे शहाणा आहे ? -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

कोरोना

Image
वात्रटिका    कोरोना कोरोना व्हायरसचा वेगळाच नाद आहे जात धर्म संप्रदायाची चर्चाच जणू बाद आहे सुखात माणूस किती दानवातील दानव बनतो संकटं आल्यावर मात्र माणूस मानव बनतो -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

वेळ

वात्रटिका वेळ गुळाची ढेप समजून धोंडा आला हाती मुंगळ्यांच्या स्वप्नांची क्षणात झाली माती सत्तेच्या समीकरणाची चविष्ट बनली भेळ डोकं फोडून घ्यायची मुंगळ्यांवरती आली वेळ...!☺️ -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

दुष्काळात तेरावा

वात्रटिका दुष्काळात तेरावा आधिच असते कामाची हवस आठवड्याचे आता पाचच दिवस कामाचे नाव घेता अनेकांना फेरावा कामाच्या दुष्काळात महिना तेरावा....! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

वेळ

वात्रटिका वेळ गुळाची ढेप समजून धोंडा आला हाती मुंगळ्यांच्या स्वप्नांची क्षणात झाली माती सत्तेच्या समीकरणाची भलतीच बनली भेळ डोकं फोडून घ्यायची मुंगळ्यांवर आली वेळ -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

राजकीय संस्कृती

वात्रटिका राजकीय संस्कृती राजनेता कल्याण करील ही भोळीभाबडी आशा नेत्यांच्या तोंडी मात्र दगड तलवारीची भाषा सोयीनुसार रंग बदलणे ही राजकारणाची शान कुणीच दिलं नसतानाही देऊ लागले आव्हान तलवारीची भाषावाले लढताना घरात असतात जखमा आणि घाव जनतेच्या उरात असतात -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

कोरोना व्हायरस

Image
वात्रटिका कोरोना व्हायरस निसर्गाचा मानवाने केला पाणउतारा निसर्गही मानवावर फिरवतोय पोतारा निसर्गाला मानवाकडून जेंव्हा जेंव्हा तडा आहे व्हायरसच्या रूपाने शिकवलेला धडा आहे कर्माची फळं द्यायला त्याच्या हाती फलक आहे आता तरी सुधरा रे कोरोना एक झलक आहे -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२

भक्तीची गत

वात्रटिका भक्तीची गत भक्तांचा नाही भावनांवर ताबा वादात अडकले शिर्डीचे साईबाबा कमी होईल मार्केटची पत अशीच काहीशी भक्तीची गत...! -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

राजमुद्रा

Image
वात्रटिका 'राज'मुद्रा शिवराय वापरल्याशिवाय राजकारण्यांचे भागत नाही त्यांच्या विचारांना मात्र कोणीच कधी जागत नाही राजकीय मुखवट्यांचा रंग दुट्टपी आणि दळभद्रा आहे झेंड्यासोबत बदललेली राजगडाची राजमुद्रा आहे -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

उचापती

Image
वात्रटिका  उचापती  मोठेपणा दाखवण्यासाठी  भाट करतात उचापती  पुन्हा पुन्हा नवनव्या वादात अडकतात छत्रपती  सारवासारव करताना  वड्याचे तेल वांग्यावर  जयभगवान प्रसिद्ध झाला  विरोधाच्या टांग्यावर -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२

सहाशे दोन

Image
वात्रटिका सहाशे दोन बांगल्याच्या नावाने अंधश्रद्धा जोपासता स्वतःचं पुरोगामीत्व सांगा कधी तपासता ? बोल बोलता वाटे सोपे करताना मात्र फाटते सहाशे दोनची मंत्र्यांनो सांगा का भीती वाटते ? -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२ Visit : aajchitika.blogspot.in वाचा रोज नव्या वात्रटिका...!