शिक्षण हक्क
वात्रटिका
शिक्षण हक्क
-----------------
आजच्या शिक्षित पालकांची
बुचकाळ्यात टाकणारी वागणी
मोफत शिक्षणाचे तीनतेरा
पैसेवाल्या शिक्षणाची मागणी
शिक्षणहक्क सांगणारा कायदा
कायद्याच्या पुस्तकात आहे
पैसा उकळायचा व उधळायचा
हे ज्याच्या त्याच्या मस्तकात आहे
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment