अंदाजाचे हवापाणी
वात्रटिका
अंदाजाचे हवापाणी
------------------------
जिची प्रेमपूर्वक निवड केली
ती आज धोकेबाज आहे
तिचे अंदाज म्हणजे
हवामान खात्याचा अंदाज आहे
तिच्या अंदाजाची नुसती
भसाभसा हवा असते
पाण्याचा कुठे पत्ता नाही
फक्त अशारूपी दवा आहे
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment