विरोधात असताना
वात्रटिका
विरोधात असताना
-----------------------
विरोधात असताना
ज्या बाबी खटकतात
सत्ताधारी बनल्यावर
त्या मनात लटकतात
सत्ताधारी बनल्यावर
थुक्याला थुका लावला जातो
सामान्य माणूस तो असतो
जो प्रत्येकवेळी कावला जातो
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment