विभक्तीचे संकेत
वात्रटिका
विभक्तीचे संकेत
--------------------
एकत्र संसारामध्ये
मधेच त्याचा तिरका बाण
प्रेमाची कमळपुष्पे कुचकामी
तिच्या डोक्याला भलता ताण
त्याच्या लहरीपणामुळे
तिच्या मनाचे पक्के बेत
तिही आता उघडपणे
देतेय विभक्तीचे संकेत
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment