जीएसटीचा मंत्र

वात्रटिका

जीएसटीचा मंत्र
--------------------
कोणी आनंदी होताहेत
तर कोणी आहेत कष्टी
का तर म्हणे इथून पुढे
लागणार आहे जीएसटी

जीएसटी ज्याला कळत नाही
तोही उगाच तणावात आहे
जीएसटीचा मंत्र सारीकडे
पुरासारखा वाहात आहे....!

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'