बेचा पाढा म्हणू या

*बालगीत*

बेचा पाढा म्हणुया
------------------------
बे एके बे
बाळा इकडे ये
दोन उडया मारुया
बेचा पाढा म्हणुया

बे दुणे चार
बाळ माझं हुशार
चार टाळया वाजवुया
बेचा पाढा म्हणुया

बे त्रिक सहा
फळ्याकडे पाहा
सहा खडे मोजुया
बेचा पाढा म्हणुया

बे चोक आठ
गाणे झाले पाठ
आठ काडया मोजुया
बेचा पाढा म्हणुया

बे पंचे दहा
गरमागरम चहा
दहा अंक लिहुया
बेचा पाढा म्हणुया

बे सखुन बारा
हिवळ्यात थंड वारा
बारा महीने मोजुया
बेचा पाढा म्हणुया

बे साते चौदा
पाणी भरा हौदात
चौदा मणी जोडुया
बेचा पाढा म्हणुया

बे आठे सोळा
मुलं झाले गोळा
सोळा पाने वाचुया
बेचा पाढा म्हणुया

बे नवे आठरा
मुलं असतात खतरा
आठरा जण पळूूया
बेचा पाढा म्हणुया

बे दाहे वीस
बाळ झालं खुश
वीस जण खेळूया
बेचा पाढा म्हणुया

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'