पार्ट टाईम जॉब

आजची वात्रटिका....!!

पार्ट टाईम जॉब
--------------------
नागपुर पासून मुंबईं पर्यंत
गुंड कसे माजले आहेत
कायदा आणि सुव्यवस्थेचे
तीन तेरा वाजले आहेत

देशाचा गाडा हाकताना
कायदा इथे हारतो आहे
जो कायदा रक्षण करतो
दिवसा ढवळया मरतो आहे

पोलिस खाते खरच
पार्ट टाईम जॉब नाही
पोलिसांना मरावे लागणे
ही साधी बाब नाही...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी