गणपती बाप्पा

*गणपती बाप्पा उठ काहीतरी कर*
-श्रीकृष्ण उबाळे,बीड

विसरलोत आम्ही धर्म
विसरलोत आम्ही भक्ती
पुर्वी असायची वर्गणी
आता असते खंडणी
खंडणीखोरांच्या मनात
काहीतरी भर
गणपती बाप्पा उठ काहीतरी कर

समाज एक व्हावा म्हणुन
तुझा उत्सव सुरु झाला
आज जातीजातीचे गल्लीबोळाचे गणपती
शेकडोने तुझी स्थापना होते
तुझ्यामुळे एकी येईल असा आग्रह धर
गणपती बाप्पा उठ काहीतरी कर

आज तर मंडळं नको तेवढे 
माजत आहेत
सैराट ,मुन्नी,जिलेबीबाई देखाव्यासह वाजत आहेत
अशांच्या डोळ्यात थोडा प्रकाश भर
गणपति बाप्पा उठ काहीतरी कर

इथला राजा भारी
तिथला राजा भारी
सारी खुळी जनता
मग तेथे गर्दी करी
हे पाहून गणेशा
वाटतो मला खेद
गणेश म्हणजे गणेश
नसतो त्यात भेद 
भेद करणाऱ्याना म्हणाव गप निट मर 
गणपति बाप्पा उठ काहीतरी कर

बाप्पा तुझ्यामुळे वाद होतात
अनेकांचे संसार बरबाद होतात
जागोजागी भोंगे नको नको वाटतात
तुझे जसे फाटलेत
तसे आमचे पण कान फाटतात
अशा विध्ववंसक लोकानां बोलव वर
गणपती बाप्पा उठ काहीतरी कर

तुझ्यामुळे मात्र बऱ्याच जणांचे बरे आहे
मूर्ती ,साहित्य,पुजा यांच्यातून रोजगार पैसा तेवढे मात्र खरे आहे 
तुझ्याशी कुणाचे नाही बघ सख्य
ज्याचा त्याचा धंदा हेच आहे मुख्य
असा धंदा करणाऱ्यांचे लगेच कान धर
गणपती बाप्पा उठ काहीतरी कर

तुझ्या विसर्जनाच्या मिरावणुकीत
पिणा-यांचीही काही कमी नाही
तुला बळजबरी दूध पाजले होते
पुढे काय पाजतील त्याची हमी नाही
दुर्बुद्धिला बुध्दी दे
असे वगणाऱ्यांला पहीले डोळास कर
गणपती बाप्पा उठ काहीतरी कर

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
   aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'