किडे व खडे
आजची वात्रटिका....!!
किडे व खडे
----------------
कश्मीर नेहमी धुसमुसतो
काही किडे वळवळतात
आपले राज्यकर्ते कसे
चर्चा करुन हळहळतात
दळणातील खडयांना
दळणातील किडयांना
मोकळे कधी सोडणार का?
कश्मीर मधील वादयांना
मुळापासून तोडणार का?
श्रीलंकेचा आदर्श
सत्तेनं एकदा घेतला पाहिजे
दहशत उखाडण्याचा विचार
मनामध्ये चेतला पाहिजे...!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment