डोळे

मुक्त काव्य स्पर्धेसाठी कविता

*डोळे*

हासतील डोळे
रडतील डोळे
नजरेतुन नजरेला
पाडतील डोळे

इशारा करतील डोळे
भीतीने थरथरतील डोळे
नजरेतुन भाव
व्यक्त करतील डोळे

लाजतील डोळे
माजतील डोळे
नजरेतुन मनातले
मोजतील डोळे

मारतील डोळे
वटारतील डोळे
नजरेनं नजरेतून
हारतील डोळे

पाहतील डोळे
वाहतील डोळे
सुख अन दुःखाचा
सार राहतील डोळे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642
  aajchitika.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी