पाकिस्तान रे पाकिस्तान

कवी,वात्रटिकाकार श्रीकृष्ण उबाळे यांची उरी हल्यावर केलेली कविता....!!

*पाकिस्तान रे पाकिस्तान*
-----------------------------------
पाकिस्तान रे पाकिस्तान
तु असला कसला देश
माणुसच आहोत ना आम्ही
इतका का रे द्वेष

तुला लेकरु मानलं
पण निघलास तु साप
असले हल्ले करताना
तुला आठवत नाही का बाप

शांत अहोत आम्ही
घाव घातलास 'उरी'
दहशत तु पोसतोस
किती रे तु माजोरी

इथून तिथून तु
करीत गेलास हल्ले
आम्ही आपले प्रेमाचे
देत होतो सल्ले

तुला वाटतं का
धर्मात तुझी शान
हिंदु सिख बौद्ध राहुदे
तुलाच गाडून टाकतील
भारतातले सच्चे मुसलमान

सैनिक आमची प्रेरणा
त्यांना लपुन मारतोस ठार
मनात जर आले ना
तुझे हाल होतील बेकार

भारत म्हणजे तुला
काय आंडु पांडु वाटलाय
बघ ना आपल्या घरात
तुझा देश सारा फाटलाय

नावात तुझ्या पाकडे
नजराणे तुझे वाकडे
आम्हालाही माहित आहे
मारायचे कसे ते खेकडे

येऊन जाऊन देतोस काय
अणुबॉम्बच्या धमक्या
जिरवायची कशी कोणाची
हा दम आमच्यात खमक्या

माणूसकीनं वागु आम्ही
तुम्हीपण माणूसकीनं वागा
नाहीतर.....!
जगाच्या पाठीवर नसेल
पाकिस्तान नावाची जागा..!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
   मो.9405344642
aajchitika.blogspot.in

कविता आवडल्यास नक्की शेयर करा...!!

सच्चे भारतीय यातील नाव वगळणार नाहीत...!!

जशी आहे तशी पुढे पाठवतिल..!!
🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏�🙏

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'