अनाथ जीवांचा नाथ होऊ

*चित्रकाव्य*

अनाथ जीवांचा नाथ होऊ
---------------------------------
ज्याला कुणाची ममता नाही
त्याची आपण माय होऊ
पोरक्या झालेल्या वासरांची
चला आपण गाय होऊ ||1||

ज्याच्या मुखी अन्न नाही
त्या मुखातील भात होऊ
ज्याला कुणाला बाप नाही
मुखी भरवणारा तात होऊ ||2||

पोरका कुणी कान्हा असेल
त्याच्यासाठी पान्हा होऊ
माणूस जर असु आपण
माय बाप पुन्हा होऊ ||3||

ज्यांचे ओठ कोरडे असतील
त्यांची ओलसर बात होऊ
जीवाला जीव समजणारी
माणसाची जात होऊ  ||4||

ज्यांनी आवाज ऐकला नाही
त्यांच्यासाठी डफडे होऊ
जे जे दिसतील उघडे सदा
त्यांच्यासाठी कपडे होऊ ||5||

ज्यांना जगात कोणी नाही
त्यांच्यासाठी मदत होऊ
ज्यांच्या पाठीवर हात नाही
त्यांचा आपण हात होऊ ||6||

ज्या दिव्यात वात नाही
त्या दिव्याची वात होऊ
ज्या दिव्याची ज्योत विझली
त्या दिव्याची ज्योत होऊ
अनाथ जीवांचा नाथ होऊ ||7||

👉🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'