लक्ष

चित्रकाव्य

*लक्ष*

लक्ष असावे पाखरासारखे
पिलांवर ठेवलेलं
शोधून आणते दाणापाणी
पिल्लू नाही जेवलेलं ||1||

लक्ष असावे पाखरासारखे
आकाशात भिडलेलं
खोप्यासाठी आणते काडी
घरटे आहे मोडलेलं ||2||

लक्ष असावे पाखरासारखे
उंच उंच ध्येयाचे
वारा येवो गारा येवो
मनात नसे भयाचे ||3||

लक्ष असावे पाखरासारखे
मायेने कोरलेलं
उंच कितीही गेले
काळजीनं भरलेलं ||4||

लक्ष असावे पाखरासारखे
विश्वसाने तंतरलेलं
आज यश मिळवणारच
मंत्राने मंतरलेलं ||5||

लक्ष असावे पाखरासारखे
काळजात बसलेलं
चिमुकल्याला पाहुन
मनामध्ये हासलेलं ||6||

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी