शाळेला चल माझ्या दोस्ता

*चित्रकाव्य*

शाळेला चल माझ्या दोस्ता
---------------------------------
पाऊस येऊ दया जोराचा
नाद नका करु या पोराचा
असुदया चिखलाचा रस्ता
शाळेला चल माझ्या दोस्ता ||1||

शाळा बुडवणे नाही ठिक
तु आदर्शाने शाळा शिक
घाबरु नको छत्री नसता
शाळेला चल माझ्या दोस्ता ||2||

आडचणीतही मज्जा करु
शिक्षणच मनात धरु
खाऊ शिक्षणासाठी खस्ता
शाळेला चल माझ्या दोस्ता ||3||

गरीबीची नाही लाज
स्वाभिमानी शिक्षण आज
पूरे करु हसता हसता
शाळेला चल माझ्या दोस्ता ||4||

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
      मो.9405344642
aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'