कर नाही त्याला
वात्रटिका
'कर' नाही त्याला 'डर' कशाला
-------------------------------------
जुलै पासून सारीकडे
लागलेला नवा कर आहे
ग्राहकांच्या मनामध्ये
बसलेला डर आहे
विरोध करून ओरडण्यात
नका देऊ ताण घशाला
ज्यावर 'कर' नाही
त्याचा 'डर' कशाला ?
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment