पाऊस
बालकविता
पाऊस
---------
पाऊस आला हो
पाऊस आला
झाडा झुडपांना
आनंद झाला
भुरभुर पाऊस
मुरमुर पाऊस
भूमीच्या टाक्या
भरून गेला
जोरात पाऊस
भरात पाऊस
तळे विहिरींना
चारून गेला
उपाशी पिकं
झालेत ठीक
त्यांचं जीवन
तारून गेला
रानातली माकडे
झालेत वाकडे
चिंचेचे आकडे
करून गेला
©श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.च-हाटा ता.जि. बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment