निवडीचा मार्ग

वात्रटिका

निवडीचा मार्ग
------------------
नगरपालिकेत चांदी झाली
आता सरपंचकी दिसू लागली
प्रतिनिधी निवडीची लोकशाही
दातं विचकून हसू लागली

मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री
निवड जनतेतून व्हायला हवी
बदलांची असेल लोकशाही
तर ती या मार्गाने जायला हवी

©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'