राजकारणी पादत्राणे
वात्रटिका
राजकारणी पादत्राणे
---------------------------
सत्ता असणे म्हणजे
पायातली चप्पल नवी
सत्ता नाही म्हणजे फाटते
त्यांनाही मग नवी हवी
सत्ताधाऱ्यांना मऊमऊ
विरोधकांना टोचत असते
सत्ताधाऱ्यांची मजा होते
यांना फाटकी बोचत असते
©श्रीकृष्ण उबाळे
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
Visit:-aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका....!!
Comments
Post a Comment