बालकविता जंगलातील न्याय
जंगलातील न्याय
----------------------
कोल्ह्याने सशावर
अत्याचार केला
फिर्याद करायला तो
लांडग्याकडे गेला
लांडगा म्हणे भाऊ
काढू त्याचा काटा
तेवढा मला माझा
देऊन टाक वाटा
केस गेली कोर्टात
वकील होता वाघ
ससा पाहून त्याच्या
भुकेला आली जाग
जज सिंह म्हणे
टाका याला आत
खोटी अन्यायाची
करतो मोठी बात
साऱ्यांनी मिळून
सशालाच खाल्ले
असे त्या जंगलाचे
न्यायदान झाले
©श्रीकृष्ण उबाळे,बीड
9405344642
Comments
Post a Comment