गणपतीचा सण

गणपतीचा सण
--------------------
गणपती बाप्पांचा
सण असतो छान
गणपती बाप्पांचे
पण फाटतात कान !!धृ!!

गणपती बाप्पावर
काय दिवस आले
पिक्चरच्या गाण्याचा
धिंगाणा चाले

कुठे वाजे ढोल
कुठे वाजे ताशा
गणपती समोर
आवाजाची भाषा

लाऊडस्पीकरने
केला सारा घोळ
आरतीच्या नावाने
चालतो गोंधळ

घरातला धर्म
रस्त्यावर येतो
तेंव्हा तेंव्हा असा
घोटाळा होतो

©श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.च-हाटा ता.जि. बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'