माझं गाव च-हाटा

माझं गाव च-हाटा
----------------------
नारायणगडाची भक्ती
भगवानगडाची शक्ती
मना- मनाचा वारकरी
रणा- रानातील धारकरी
असं माझ गाव च-हाटा

मैदानातील खेळ
आदर्शाचा मेळ
सैन्यदलातील शान
पोलिसदलातील मान
असं माझ गाव च-हाटा

जुन्या नव्याची जोड
साखरेहूनही गोड
दुधदुभत्याची ओढ
माणुसकीची तडजोड
असं माझ गाव च-हाटा

क्षेत्रा क्षेत्रातील राव
खाऊन जातो भाव
सुविचारांचा ठाव
देशात एकच नाव
असं माझ गाव च-हाटा

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी