सावित्री माय
सावित्रीबाई फुले संग्रहाकरिता कविता....!!
सावित्री माय
----------------
सावित्रीबाई माय माझी
रचला शिक्षणाचा गड
पोरिंसाठी करीत असे
उदार होऊन धडपड
माय खाई दगडगोटे
लेकींच्या प्रेमापोटी
क्रांतीची भाषा तिच्या
सदा असे ओठी
माय सांगे शिक्षणाने
व्हाल तुम्ही मानव
अनाथांची नाथ तिला
मानवतेची कणव
माय झाली खंबीरपणे
ज्योतिबांचा कणा
ठेचून काढी ताकतीने
धर्ममार्तंडांचा फणा
मूल न होता तिला
आई होता आलं
डॉक्टर न होता तिला
दाई होता आलं
पोरींच्या जीवनात तिला
उजेड बनता आलं
जीवनभर लढून तिला
लढ म्हणता आलं
©श्रीकृष्ण उबाळे
मु.पो.च-हाटा ता.जि.बीड
मो.9405344642
Comments
Post a Comment