पक्षांतराचे फळ

स्पर्धेसाठी वात्रटिका

पक्षांतराचे फळ
-------------------
स्व'पक्षा'पासून पक्षी उडे
भरून आलेल्या आकाशी
उडणाऱ्या पक्षाचे लक्ष
फक्त असते सत्तेपाशी

आकाशातून न्याहाळतो
कुठे आपणास संधी आहे
आपण असलेल्या पक्षात
पदांची खूपच मंदी आहे

त्याच्यासाठी रंग सारे
बापाघरचा ठेला आहे
तो तो पदे मिळवत जातो
जो पक्षांतर करून गेला आहे

©श्रीकृष्ण सुंदरराव उबाळे
     मु.पो.च-हाटा ता.जि.बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी