गझल

माझी गझल

नको त्याला रोज सलाम आहे
खांदा माझा का गुलाम आहे

धर्म करीत मरतो तो देशद्रोही
देशासाठी झुरतो तो कलाम आहे

हल्ले काय करता निच पकड्यांनो
दुधातील साखर तो इस्लाम आहे

सुधारून घ्या लवकर दुष्मनांनो
आमच्या हृदयात बसतो तो राम आहे

ओरबाडून घ्या रे तुम्ही खादाडांनो
म्हाडावर तुमच्या चिल्लर दाम आहे

©श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी